आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली:गरीब कल्याण पर्व अंतर्गत ; भाजप युवा मोर्चाची विकास तीर्थ रॅली

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेवा, सुशासन व गरीब कल्याण पर्व अंतर्गत भाजप युवा मोर्चा नाशिक महानगराच्या वतीने विकास बाइक रॅली काढण्यात आली. सिन्नर फाटा येथून रॅलीला सुरुवात होऊन सेंट्रल पार्क येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.

या रॅलीवेळी केंद्र सरकार व नाशिक महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांना भेट देण्यात आली. रॅलीचा शुभारंभ भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे व आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. समारोपप्रसंगी जाहीर सभा होऊन आमदार सीमा हिरे यांनी संबोधित केले.

युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित घुगे यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीत कन्हैया साळवे, अशोक सातभाई, राजेश आढाव संतोष नेरे, अविनाश पाटील, चंद्रशेखर पंचाक्षरी, शिवाजी बरके, संदीप शिरोळे, डॉ. वैभव महाले, हर्षद जाधव, विपुल सुराणा, शैलेश साळुंखे, योगेश मैंद, अंकित संचेती, विजय बनछोडे, सुमित नहार, निखिलेश, गांगुर्डे, ऋषिकेश आहेर, साक्षी दिंडोरकर, प्रशांत वाघ, विनोद येवले, विजय गायखे, गणेश मोरे, विशाल पगार, अमोल पाटील, किरण गाडे, आदित्य दोंदे, रोहन कानकाटे, शांताराम घंटे, नवनाथ ढगे, सतीश रत्नपारखी, गौरव विसपुते, पवन गुरव, विकी ठाकरे, उमेश मोहिते, अक्षय पाटील, अर्जुन मुंडे, पुनित कांकरिया आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...