आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईनाका परिसरातील वाहतूक काेंडी फाेडण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र दोन अंडरपास तयार करण्याचा प्रस्ताव महापालिकेने रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सादर केला. याचबराेबर या ठिकाणांहून एस.टी.चीही वाहतूक वळवण्याबाबतचा प्रस्तावी समितीच्या बैठकीत सादर झाला आहे. रस्ता सुरक्षा समितीची त्रैमासिक बैठक पंचवटीतील विभागीय कार्यालयात बुधवारी (दि. १) पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शहरातील ब्लॅकस्पाॅट , वाहतूक कोंडी, सिग्नल यंत्रणा अशा विविध मुद्यांवर सखोल चर्चा झाली. मनपा शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. तसेच शहरातील वाहतूक काेंडीची समस्या साेडविण्यासाठी पायलट टेस्टिंग म्हणून पोलिस, मनपा व रेजिलियंट इंडिया संयुक्तपणे सिव्हिरिटी इंडेक्स इ-एन्फाेर्समेंट सिस्टिमची पडताळणी करण्यात येणार आहे.
इंदिरानगरजवळील उड्डाणपुलाच्या प्रस्तावित बोगदा विस्ताराच्या कामाला चार महिन्यांत सुरुवात हाेणार असल्याचे यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे बी. एस. साळुंखे व डी. आर. पाटील यांनी दिली. मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे, प्रादेशिक परीवहन अधिकारी प्रदीप शिंदे, पीडब्लूडीचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता उदय पालवे, रेजिलियंट इंडिया कंपनीचे राजीव चौबे व प्रियंका लखोटे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. रवींद्र सोनोने यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित हाेते
३४३ अतिक्रमणांवर बुलडाेजर
शहरातील रस्त्यांवरील ३४३ ठिकाणी अनधिकृत बांधकामाबाबत नगर नियोजन विभागाच्या वतीने नोटिसा बजाविण्यात आलेल्या आहेत. याविराेधात अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाणार असून या अतिक्रमणावर लवकरच बुलडाेझर चालविला जाणार आहे. त्याची कारवाई लवकरात लवकर केली जाणार आहे.
२६ ब्लॅकस्पाॅटच्या सुधारणेसाठी निविदा
शहरातील २६ ब्लॅकस्पाॅटपैकी ६ हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, ४ पुणे राष्ट्रीय महामार्ग, ४ औरंगाबाद रोड, १ पेठ रोड, १ दिंडोरी रोड, ३ त्र्यंबकराेड व ७ मनपा रस्त्यावरील आहेत. त्यामुळे शहरातील २६ ब्लॅकस्पॉट येथे सुधारणा करण्यासाठी दोन दिवसांत मनपाच्या बांधकाम विभागाकडून निविदा काढण्यात येणार असल्याचे यावेळी या बैठकीत सांगण्यात आले.
गतिराेधकबाबत ७ तज्ज्ञांची समिती
शहरात गतिराेधक बसविण्याबाबतचा निर्णयासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामध्ये मनपा, एनएचएआय, पीडब्ल्यूडी, आरटीओ, पोलिस विभागातील अधिकारी आणि के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमधील डॉ. विलास पाटील, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. रवींद्र सोनोने या सर्वांचा समावेश असणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.