आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आयकर कायद्यातील बदल समजून घ्यावे ; कार्यशाळेत आयकर सहआयुक्त हर्षद आराधी यांचे मार्गदर्शन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयकर कायद्यांमध्ये अतिशय गतिमान बदल होत असून हे बदल कर सल्लागारांनी समजून घेतले पाहिजे. येणारे प्रत्येक नोटिफेकेशन समजाऊन घेऊन त्यानुसार आपल्या ग्राहकाला त्याची माहिती दिली पाहिजे. कर सल्लागार हे अतिशय महत्त्वाचे व जबाबदारीचे काम करत असतात ते समाजातील लोकांना अतिशय योग्य पद्धतीने मार्गदर्शन करत असून आयकर विभाग व करदाते यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असतात, असे प्रतिपादन आयकर सहआयुक्त हर्षद आराधी यांनी केले.

टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन नाशिकच्या वतीने आयाेजित ‘टॅक्स ऑडिट आयकर कायद्यातील बदल व तरतुदी’ या विषयावरील कार्यशाळेत आराधी मार्गदर्शन करत हाेते. व्यासपीठावर वरिष्ठ कर सल्लागार सुरेश बोथरा, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बकरे हाेते. आगाऊ कर भरण्याकरिता १५ सप्टेंबर ही अंतिम तारीख असून नाशिकमधील जास्तीत जास्त करदात्यांनी आपल्या कराचा भरणा करावा, असे आवाहन आराधी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश विसपुते यांनी केले प्रमुख पाहुणे व वक्ते यांचा परिचय नितीन डोंगरे, अनिकेत कुलकर्णी यांनी करून दिला व आभारप्रदर्शन संजय सोनवणे यांनी केले.

व्यापाऱ्यांच्या उलाढालीनुसार आयकर कायद्यातील नियम
प्रमुख वक्ते सीए अभिजीत मोदी म्हणाले की, आयकर कायद्यातील कलम ४४ एबी व ४४ एडी याबाबतचे नियम व्यापाऱ्यांच्या उलाढालीनुसार लागू होत असतात. ज्या व्यवसायिकाची वार्षिक उलाढाल १ कोटीपेक्षा अधिक असेल अशा व्यवसायिकांना कर लेखापरीक्षण करणे सक्तीचे आहे परंतु ज्या व्यवसायिकांचे आर्थिक व्यवहार हे ९५ टक्के डिजिटल स्वरूपातील असतील अशांना मात्र ही मर्यादा १० कोटीपर्यंत आहे. जे व्यक्ती पेशाने व्यवसायिक आहेत त्यांना मात्र कमाल मर्यादा ५० लाख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...