आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव सादर:पालिकेकडून अंगणवाडीतील 11,000 बालकांना गणवेश

नाशिक8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या अंगणवाड्यांमधील ११,००० विद्यार्थ्यांना मनपा शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे गणवेश देण्याचा विचार सुरू झाला आहे. यासंदर्भात मनपाच्या समाजकल्याण विभागाकडून आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

शहरात ३४७ अंगणवाड्यांमध्ये ११ हजार मुले शिक्षण घेतात. या मुलांना एक ड्रेसकोड असल्यास मुलांची ओळख अंगणवाडीतील विद्यार्थी म्हणून निर्माण होईल असा त्यामागे विचार आहे. दरवर्षी राज्य शासनाच्या अनुदानातून तसेच काही प्रमाणात पालिकेच्या हातभारातून सर्वच विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. त्याच धर्तीवर अंगणवाड्यांमध्येही गणवेश देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सेविका, मदतनीसांनाही मिळणार गणवेश
विद्यार्थ्यांबरोबरच ३२० अंगणवाडी सेविका आणि ३११ मदतनीस आणि ५ मुख्य सेविकांना गणवेश देण्याबाबत समाजकल्याण विभागाकडून प्रस्ताव आहे. विद्यार्थी तसेच सेविका आणि मदतनीस यांना वर्षाला दोन गणवेशांचा खर्च महिला व बालकल्याण विभागाच्या निधीतून करता येणे शक्य आहे. त्यास मंजुरीकरिता आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे.