आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोरोनाकाळात अविरत कार्य; डॉक्टर अन् आरोग्य कर्मचाऱ्यांची २४ तास सेवा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 22 हजार रुग्णांसाठी 108 रुग्णवाहिका ठरली प्राणदूत

कोरोनाकाळात पॉझिटिव्ह रुग्णांसाठी शासनाची १०८ या रुग्णवाहिका प्राणदूत ठरली. जिल्ह्यात कोरोनाकाळात २२ हजार २८९ कोरोना रुग्णांना या रुग्णवाहिकेत वेळीच उपचार मिळाल्याने रुग्ण वाचले. कोरोनाकाळात ग्रामीण भागात रुग्णांचे सर्वाधिक हाल झाले. भीतीपोटी रुग्ण नेण्यास कुणी तयार होत नव्हते अशा प्रतिकूल परिस्थितीत १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि चालकांनी २४ तास सेवा देत आपले कर्तव्य बजावले. १०८ रुग्णवाहिकांमुळे कोरोनासह अपघातग्रस्त दोन लाख ७३ हजार ११६ रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाकाळात सर्वाधिक बिकट परिस्थिती होती. ४६ रुग्णवाहिका कार्यरत होत्या. यामध्ये ११ रुग्णवाहिकांमध्ये अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट असल्याने अतिगंभीर रुग्णांना कोविड सेंटरपर्यंत वेळीच पोहोचविण्यास या रुग्णवाहिकांना मोलाचे कार्य केले. ३५ रुग्णवाहिकांतून इतर रुग्णांना दाखल करण्यात येत होते. गंभीर होणाऱ्या प्रत्येक कोरोना रुग्णाला केवळ शासकीय रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये आणले जात होते. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी या रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध होत्या. आजही सेवा देत आहे. १०८ रुग्णवाहिका चालक १०८ आणि १०६ डॉक्टर्स कोरोनाकाळात १०८ सुसज्ज कोरोनाच्या काळात सेवा देत होते. पीपीइ कीट, हॅण्ड सॅनिटायझर, मास्क, ग्लोब्ज, मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले होते. रुग्णवाहिका निर्जंतुकीकरण प्रशिक्षण व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्ण हाताळल्यानंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करून पुढील रुग्ण हाताळला जात होता.

रुग्णसेवेला प्राधान्य
कोरोनाकाळात रुग्णांना वेळीच उपचार मिळावे याकरिता नियोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातून पोझिटिव्ह रुग्णांना कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यासह त्यांच्यावर रुग्णवाहिकेत उपचार दिले. - डॉ. अश्विन राघमवार, झोनल व्यवस्थापक

अडीच वर्षांपासून सेवा
२०२० मध्ये १८२९२ रुग्ण, २०२१ मध्ये ३८८२ रुग्ण, २०२२ मध्ये ११५ रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेने आधार दिला. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून दोन लाख ७३ हजार १११६ रुग्णांचे प्राण वाचवण्यास यश आले आहे.

अशी आहे १०८ ची सेवा
जिल्ह्यात ४६ रुग्णवाहिका असून ११ रुग्णवाहिका एएलएस, ३५ रुग्णवाहिका बीएलएस आहेत. कोरोना-काळात व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेमुळे जीवनदान मिळाले आहे. २४ तास डॉक्टर असल्यामुळे त्वरित रुग्णांवर उपचार सुरू करून हॉस्पिटलला अॅडमिट केले जात होते.

बातम्या आणखी आहेत...