आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. या बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यात मेट्रो संदर्भात अनेक महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. यामध्ये महाराष्ट्रासाठीही एक महत्त्वाची घोषणा आहे. सीतारमण यांनी नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी मोठी आर्थिक तरदूत जाहीर करत असल्याचे सांगितले आहे. नाशिक निवडणुकीपूर्वी हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
भारतात मेट्रो लाइट आणि मेट्रो नॅनो तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असल्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. देशातील टू टीयर आणि वन टीयर शहरांच्या आजूबाजूच्या भागामध्ये या मेट्रोचे जाळे उभारण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या विशेष निधीमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचाही उल्लेख आहे. नागपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचे काम होणार आहे. तर नाशिकमध्येही मेट्रो येणार असल्याची घोषणा सीतारमण यांनी केली आहे. नाशिक मेट्रोसाठी केंद्राने अशाप्रकारे पहिल्यांदाच निधी उपलब्ध करुन दिला आहे.
निवडणुकींपूर्वी महत्त्वाचा निर्णय
नाशिक निवडणुकीपूर्वी हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. लवकरच नाशिक महापालिका निवडणुका पार पडणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीतारामन यांनी नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5,976 कोटींची घोषणा केली आहे. तर नाशिक मेट्रोसाठी 2,092 कोटींची तरतूद जाहीर केली आहे.
आजच्या अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी विक्रमी 1,10,055 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीतील 1,07,100 कोटी रुपये केवळ भांडवली खर्चासाठी वापरले जातील. राष्ट्रीय रेल्वे योजना 2030 या प्रोजेक्टसह मेट्रो, सिटी बस सेवेला प्रोत्साहन दिले जाईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.