आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांच्या उपस्थितीत सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर येथील एकलव्य निवासी विद्यालयाचे भूमिपूजन व आदिवासी शेतकरी, शेतमजुरांचा मेळावा येत्या शुक्रवारी (१३ मे) दुपारी ११ वाजता हतगड येथे आहोजित करण्यात अाला आहे. यानिमित्ताने केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. भारती पवार यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
सुरगाणा तालुक्यात विविध कार्यक्रमांना व पेसा ग्रामपंचायतमधील प्रतिनिधींशी संवाद मंत्री मुंडा हे साधणार आहेत. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांशी संवाद, आदिवासी कला पथक आणि खाद्यसंस्कृती याचाही ते आस्वाद घेणार असल्याची माहिती डाॅ. पवार यांनी दिली.
अमृत महोत्सवानिमित्ताने स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती दिलेल्या हजारो वनवासी माता-भगिनी, युवक, नागरिक जनजातीय पूर्वजांना हतगड येथे मानाचा मुजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमास माजी मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बोरसे, आमदार अॅड. राहुल ढिकले व शहर व ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.