आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:विद्यापीठ अधिसभा अध्यापक‎ प्रतिनिधी निवडणूक आज‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेट निवडणुकीनंतर आता‎ सावित्रीबाई फुले पुणे‎ विद्यापीठाच्या विविध‎ अधिकार मंडळांवर प्रतिनिधी‎ निवडून देण्याची प्रक्रिया सध्या‎ सुरू आहे. या अंतर्गत‎ विद्यापीठाच्या अधिसभेवर‎ अध्यापक प्रतिनिधी म्हणून‎ निवडून देण्यासाठी तसेच‎ अभ्यास मंडळ व विद्या‎ परिषदेवर प्रतिनिधी निवडून‎ देण्यासाठी रविवारी (दि.८)‎ मतदान प्रक्रिया होणार‎ असल्याची माहिती‎ विद्यापीठाचे निवडणूक निर्णय‎ अधिकारी डॉ. प्रफुल्ल पवार‎ यांनी दिली.‎

यामध्ये महाविद्यालय /‎ परिसंस्थेतील १० अध्यापक‎ आणि विद्यापीठातून ३‎ अध्यापकांची नेमणूक केली‎ जाणार आहे. तसेच प्रत्येक‎ विद्याशाखेचे २ अध्यापक‎ यांची विद्यापरिषदेवर व‎ महाविद्यालयातील ३‎ विभागप्रमुख प्रत्येक अभ्यास‎ मंडळावर निवडून देण्यात‎ येणार आहे. या जागांसाठी ८‎ जानेवारीला यासाठी मतदान‎ होणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...