आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दोन अल्पवयीनांकडून शाळकरी मुलावर अनैसर्गिक अत्याचार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत जाणाऱ्या मुलाला अंघोळ करण्यासाठी घेऊन जात त्याच्यावर दोघा मुलांनी अनैसर्गिक अत्याचार करत गळ्यावर ब्लेडने वार केल्याचा धक्कादायक प्रकार सातपूर परिसरात उघडकीस आला. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगा पायी शाळेत जात असताना परिसरात राहणारे दोन मित्र भेटले दोघांनी पीडित मुलाला अंघोळ करण्यासाठी शिवाजीनगर परिसरात घेऊन गेले. दोघांनी संगमनतत करत मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला.

मुलगा रडत असल्याने दोघांनी कुणास काही सांगू नये म्हणून मुलाच्या डोक्यात दगड मारून गळ्यावर ब्लेड मारत जखमी केले. मुलगा घरी आल्यानंतर काही बोलत नसल्याने त्याच्या आईने मुलास विचारले असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...