आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, संशयित पतीवर गुन्हा दाखल

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्याच्या रागातून पतीने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित पतीच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीरज ललित नारंग (४६, रा. होलाराम कॉलनी) असे या संशयित पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१० ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत राहत्या घरी पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने याचा जाब विचारला असता पतीने घरात बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या काळात वारंवार अनैसर्गिक अत्याचार केले अशी तक्रार पीडितेने पोलिसांत दिली. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...