आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यंदा कडक थंडीचा काळ कमी राहिल्याने आंब्याला मोहोर कमी लागला. वर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने लागलेला मोहोर गळून गेला. परिणामी कोकणात यंदा हापूसच्या उत्पादनात सुमारे ६० टक्के घट होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नाशिकसह अन्य बाजारपेठेत दाखल होत असलेल्या रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याचे भाव तेजीत आहेत. हे भाव सुमारे साडेचार हजार रुपयांना पेटी (चार ते पाच डझन)असे असून सामान्यांच्या जिभेला हापूसची चव महागडी ठरणार असल्याचे चित्र आहे. सध्या विविध शहरांत हापूस आंब्याची आवक सुरू असली तरी ती अत्यंत कमी आहे. ही आवक वाढल्यानंतर हे भाव काही प्रमाणात उतरू शकतील. परंतु तोवर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कारण काय? : यंदा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या दिशेने उत्तर भारतात येणाऱ्या पश्चिमी चक्रवातामुळे वातावरणात सतत बदलत राहिले. कधी अवकाळी पाऊस तर कधी अचानक वाढलेले तापमान तर कधी थंडीची लाट. शिवाय थंडीचा कालावधी फक्त ५० ते ६० दिवसांचाच राहिला. परिणामी याचा हापूस आंब्यांवर परिणाम झाला. मुंबई, पुणे, नाशिक शहरात हापूस दाखल झाला आहे. मात्र, आवक कमी असल्याने दरात तेजी आहे.
अवकाळी पावसामुळे मोहोर गळून गेला
यंदा थंडीचा कालावधी कमी असल्याने आंब्याला लागणारा मोहोर कमी होता. वर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे लागलेला मोहोर गळून गेला. त्यामुळे आम्हाला खूप जास्त आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. -प्रवीण भदाणे, हापूस आंबा उत्पादक, रत्नागिरी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.