आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरे फ्री होल्ड करेपर्यंत सिडको प्रशासकीय कार्यालय सुरूच ठेवा:नाशिकच्या शिंदे गटाच्या शिष्ट मंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोने लिज होल्डने दिलेली घरे फ्री होल्ड करून घरधारकांना संपूर्ण मालकी मिळेपर्यंत सिडको प्रशासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बाळासाहेबांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांनी म्हटले आहे की, नवीन नाशिक येथे सिडकोने सदनिका धारकांना 99 वर्षे कराराने 25, 000 घरे विकली असून अंदाजे 5,000 वेगवेगळया वापरांचे भूखंड वाटप केलेले आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अंदाजे 1500 टपरी भूखंडे देखील वाटप केलेली आहेत.

सिडकोने ‘लिज होल्डने’ दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ करून घरधारकांना संपूर्ण मालकी द्यावी. अशी सिडकोवासियांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. वाढीव बांधकाम करतांना या कामगार व अल्प उत्पन्न गटातील घरधारकांना कर्ज काढावे लागते. मात्र, लिज होल्ड मालमत्ता असल्याने अनेक बँका कर्ज देत नाहीत.

काही वित्त संस्था याचा लाभ उठवत जास्त व्याजदराने कर्ज देऊन पिळवणूक करतात. लिज होल्ड ऐवजी ‘फ्री होल्ड’ मालमत्ता झाल्यास घरधारकाला घराचा पुनर्विकास करणे सुलभ होईल. तसेच, फ्री होल्डची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सिडको प्रशासकीय कार्यालयाचे कामकाज बंद करू नये, अशी विनंती करण्यात आली. या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा करून सर्वांच्या भावना लक्षात घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी शिवसेना सचिव संजय माशेलकर, नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख जयंत साठे, संपर्क प्रमुख संजय बच्छाव, जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक लक्ष्मी ताठे, महानगर प्रमुख अस्मिता देशमाने, युवासेना जिल्हा प्रमुख योगेश म्हस्के, सदानंद नवले, अ‌ॅड. श्रद्धा जोशी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...