आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबर फटका:अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या बागा उद्धवस्त; व्यापाऱ्यांना मात्र द्राक्ष गोडच, पाहा PHOTO

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे गेली काही दिवस द्राक्षबागायतदार शेतकरी नैराश्यात असल्याचे दिसून येत आहे. या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सलग तीन-चार वर्षे अडचणीत असलेल्या द्राक्षबागायतदारांचे यामुळे कंबरडे मोडले आहे.

द्राक्षबागांचे तत्काळ पंचनामे करून शासनाने मदत द्यावी, अशी अपेक्षा द्राक्षबागायतदार व्यक्त करीत आहेत.

यावर्षी द्राक्षाला प्रति चार किलोस अगदी 80 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. अपेक्षित दर मिळत नसल्याने द्राक्षबागायतदारांच्या यावर्षीच्या हंगामावरही पाणी फिरले आहे. त्यातच हे अवकाळीचे संकट.

द्राक्षघडात पाणी साचत असल्याने मणीकुज होत आहे. द्राक्षाचा दर्जा खालावत आहे.

बागायतदारांवर ओढवलेल्या संकटाचा गैरफायदा दलाल व व्यापारी घेत आहेत.

अत्यल्प दरात द्राक्षाची खरेदी केली जात आहे. यामध्ये प्रचंड तोटा होत आहे.

सलग एका पाठोपाठ तीन वर्षे तोट्यातच निघाल्याने द्राक्षबागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

शासनाने यापूर्वी अपेक्षित मदत केली नाही. चालू हंगामात अवकाळीमुळे नुकसान होत आहे.

प्रत्येक वर्षी ‘गोड द्राक्षांची, कडू कहाणी’ बागायतदारांकडून ऐकायला मिळते.

मात्र, दुसऱ्या बाजूला व्यापारी, दलालांना द्राक्षांमधून फायदाच फायदा होत आहे.

द्राक्ष निर्यातीला ब्रेक लागलेला असतांना लोकल बाजारात द्राक्षाकडे कुणी बघायला सुद्धा तयार नाहीये. त्यामुळे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला द्राक्षाचा मनुका करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.