आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतमाता की जय अशा घोषणा:आझादी का अमृत महोत्सव फलकाचे अनावरण

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमती रंगूबाई जुन्नरे शाळेतील पालक-शिक्षक संघाच्या वतीने स्वतंत्र भारताचे ७५ वे वर्ष व नाशिक एज्युकेशन संस्थेचे शतकमहोत्सवी वर्ष हे औचित्य साधून शाळेत "आझादी का अमृत महोत्सव’ फलकाचे अनावरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भारतमाता की जय अशा घोषणा देत अनावरण केले. मुख्याध्यापिका कल्याणी अग्निहोत्री यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

वैशाली पाठक यांनी सूत्रसंचालन केले. अमोल करपे यांनी आभार मानले. कार्यक्रमास माँटेसरी विभागाच्या मुख्याध्यापिका स्मिता वाळवेकर, सुमित जोशी, योगेश कुलकर्णी, सौ. अलका सारंग, शीतल पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. प्रा. सूर्यकांत रहाळकर व प्रा. दिलीप फडके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या व आनंद व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...