आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्राईम:/ यूपीचे मुख्यमंत्री याेगींना बाॅम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास नाशकातून अटक

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दाेघे संशयित ट्रान्झिट रिमांड मिळवत उत्तर प्रदेश पाेलिसांकडे स्वाधीन

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांना बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्यास दाेन दिवसांपूर्वी मुंबईच्या दहशतवादविराेधी पथकाने अटक केली होती. त्यास साेडून दिले नाही तर त्याचे वाईट परिणाम हाेतील, अशी धमकी देणारा संदेश पाठवणाऱ्यांना दाेघा संशयितांना नाशकातून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या दाेघा संशयितांचा ट्रान्झिट रिमांड मिळवत उत्तर प्रदेश पाेलिसांकडे स्वाधीन केले. 

मुंबईच्या काळाचाैकी दहशतवादविराेधी पथकाच्या युनिटला उत्तर प्रदेश पाेलिसांकडून २३ मे राेजी माहिती प्राप्त झाली की, त्यांच्या साेशल मीडिया सेलवर व्हाॅट्सअॅपद्वारे मुख्यमंत्री याेगी यांना बाॅम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याचा मेसेज प्राप्त झाला आहे. धमकी देणाऱ्या आरोपींचा माेबाइल क्रमांक व लाेकेशन ट्रेस करून उत्तर प्रदेश पाेलिसांनी मुंबई पाेलिसांना माहिती दिली. त्यानुसार पाेलिसांनी मुंबईतून मेसेज देणाऱ्यास तत्काळ अटक करून चाैकशीसाठी उत्तर प्रदेश पाेलिसांच्या स्वाधीन केले.

बातम्या आणखी आहेत...