आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अद्ययावत मशीन, उदरनिर्वाहापुरते कमिशन; समान रेशनकार्ड गरजेचे

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरीब जनतेला दोन वेळ पोटभर जेवण मिळावे यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या रेशन दुकानदारांना आता स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाहापुरते कमिशन किंवा मानधनासाठी झगडावे लागत आहे. रेशन यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी अद्ययावत मशीन, उदरनिर्वाहपुरते कमिशन वाढ, धान्य मिळण्यास पात्र सर्वच गटांना एकाच प्रकारचे कार्ड आणि रेशनकार्ड धारकांची उत्पन्नाची मर्यादा वाढ या ४ बाबींच्या पूर्ततेची अपेक्षा व्यक्त करताना ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य संघटनेने शासनाने प्रलंबित असलेल्या ११ मागण्यांची पूर्तता केल्यास रेशन वितरण व्यवस्थेत सुसूत्रता येईल, असा विश्वास व्यक्त केला.

शनिवारी (दि. १२) दैनिक ‘दिव्य मराठी’त आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात रेशन दुकानदारांनी शासनदरबारी असलेल्या प्रलंबित मागण्या तसेच सोयी-सुविधांअभावी लाभार्थींना नियमित, वेळेत सेवा अर्थात धान्य देेणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे वाद होत आहे. आधीच पुरेसे कमिशन मिळत नाही. तेही महिनोंमहिने दिले जात नाही. नाशिकची परिस्थिती चांगली असली तरीही इतर जिल्ह्यांना तर कोरोनातील मोफत धान्य वितरणाचे कमीशन मिळाले नाही.

अनेकांकडून धान्याचे पैसे भरुन घेतले तेही परत मिळाले नसल्याने दुकानदारांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. काेराेनात सर्व काही बंद असताना रेशन वितरण मात्र सुरू होते. राज्यात २०० ते जिल्ह्यात २५ दुकानदारांचा जीव गेला.

पण, त्यांच्या कुटुंबियांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. जर दुकानदारांनी स्वत:चा जीव देऊ सेवा दिली तर त्याचे मोल सर्वांनाच समजायला हवे. पण, जनताही वाईट नजरेने बघते अन् शासनाही उडवून लावते. त्यामुळे आम्ही करणार काय? अशी खंत दुकानदार संघटनेचे राज्याध्यक्ष गणपत डोळसे पाटील यांनी व्यक्त केली. महिला जिल्हाध्यक्ष अरुणा चव्हाण यांनी ऑनलाइनला नेटवर्क मिळत नाही, ही समस्या त्वरित निकाली काढावी असे मत व्यक्त केले.

तर शहराध्यक्षा गौरी आहेर यांनी ऑनलाइन धान्य दिले जात असल्याने परमीट आणि पैसेही ऑनलाइनच भरून घेण्याची व्यवस्था करावी, उगाच ऑफलाइन ठेवून छळवणूक करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी खजिनदार ढवळू फसाळे, कैलास पाटील, गोपीनाथ मोरे, फारुक हुसैन, योगेश बस्तासे, माधवराव गायधनी, धर्मराज चौधरी, मनीष डमरे आदींनीही नव्या इ-पॉससह वेळेत आणि पूर्ण धान्य देण्यासह थकीत असलेले कमीशनचे संपूर्ण राज्याचेच पैसे वितरीत करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

२० तारखेच्या आत धान्य मिळावे
मशिनमध्ये धान्य अपलोड केल्यानंतरच ते रेशन धान्य दुकानदारांना द्यावे, २० तारखेच्या आत ते मिळाले तरच लाभार्थींना वेळेत वितरीत होईल. - निवृत्ती कापसे, नाशिक जिल्हाध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...