आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमधील 76 पंपावर ठणठणाट:बीपीसीएलचे सर्वाधिक 55 पंप बंद; एचपीचे 14 तर आयओसीचे 7 पंप कोरडे

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहरासह जिल्ह्यात ४६५ पैकी ३८९ म्हणजे ८४ टक्के पंपांवर इंधन पुरवठा सुरळीत झाला. तर अद्याप ७६ पं‍पावर पेट्रोल-डिझेलचा तुटवडा आहे. सर्वाधिक ५५ बंद पंप हे भारत पेट्रोलियमचे (बीपीसीएल) आहेत. त्या खालोखाल हिंदुस्तान पेट्रोलिएमचे १४ व इंडियन ऑईलचे ७ पंपांवर डिझेल नाही. दरम्यान, पुढील तीन दिवसात इंधन पुरवठा परिस्थिती सुरळीत होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली.

क्रेडिट नोटवर इंधन

इंधन खरेदी आंदोलनानंतर शहर व जिल्ह्यातील पंपावर इंधनाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. तर बहुतांश पंप इंधन नसल्याने बंद होते. सद्यस्थितीत ८४ टक्के पंप सुरू झाले आहेत. मात्र, सर्वाधिक समस्या ही भारत पेट्रोलिएमच्या पंपावर दिसत आहे. तिन्ही कंपन्यांमध्ये सर्वाधिक ४६५ पैकी १७६ पंप हे बीपीसीएल कंपनीचे आहे. बीपीसीएलकडून या अगोदर पेट्रोलपंप डिलर यांना क्रेडिट नोटवर इंधन दिले जायचे.

कृत्रिम टंचाई

मात्र आता आगाऊ पैसे द्या व इंधन खरेदी करा ही पाॅलिसी लागू केली. त्यामुळे बीपीसीएलचे पेट्रोलपंप कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचे बोलले जात होते. अखेर जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी तिनही इंधन कंपनी अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यात ७६ पेट्रोलपंप बंद असल्याचे समोर आले. सर्वाधिक बीपीसीएलचे पंप बंद आहेत. इंधन पुरवठा सुरळित करा, ग्राहकांना त्याचा फटका बसता कामं नये अशी सूचना वजा तंबीच जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी दिला. त्यानंतर पुढील दोन तीन दिवसात इंधन पुरवठा परिस्थिती सामान्य होईल, असे आश्वासन कंपन्यांच्या प्रतिनिधीनी दिले.

पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश

मी तिन्ही कंपनीच्या प्रतिनिधीची बैठक घेऊन इंधन पुरवठा सुरळीत करा, अशी सूचना दिली. ८४ टक्के पंप सुरू आहे. वाहनचालकांनी पॅनिक न होता टॅंक फtल करण्याऐवजी सहकार्य करावे.

- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

बातम्या आणखी आहेत...