आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि. ५) जूनला सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा २०२२ (नागरी सेवा) घेण्यात आली. या परीक्षेसाठी शहरातील १९ केंद्रांवर व्यवस्था होती. सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत पहिला पेपर तर दुपारी २. ३० ते ४.३० या वेळेत दुसरा पेपर झाला. यूपीएससी परीक्षेचे नाशिकमध्ये केंद्र झाल्यानंतर यावर्षी दुसरी परीक्षा पार पडली. रविवारी झालेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेची काठिण्य पातळी मागील परीक्षांच्या तुलनेत जास्त नसल्याची परीक्षार्थींनी सांगितले. या पूर्व परीक्षेला एकूण ६१९८ परीक्षार्थींपैकी ३५९७ उमेवारांनी परीक्षा दिली तर २६०१ परीक्षार्थी गैरहजर राहिले. पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्य परीक्षा होईल. मुख्य परीक्षेचे केंद्र मुंबई येथे असून निकालानंतर मुलाखती हाेतील. नाशिकमध्ये युपीएससी परीक्षेचे केंद्र झाल्यानंतर पहिल्या वर्षी विद्यार्थी संख्या कमी असली तरी यंदा मात्र ६१९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा परीक्षा केंद्रांची संख्याही यावर्षी वाढली. युपीएससीतर्फे घेण्यात आलेली सिव्हिल सर्व्हिसेस पूर्वी परीक्षा २०२२ सर्व केंद्रांवर सुरळीत पार पडली. १९ केंद्रांवर ६१९८ उमेदवारांपैकी पेपर एकला २५६० तर पेपर दोनला २६०१ उमेदवारांनी दांडी मारली. युपीएससी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या पूर्वसंध्येला परीक्षा केंद्रांना भेट देऊन तयारीचा आढावा घेऊन नियोजन केले होते. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह ५५० कर्मचाऱ्यांनी परीक्षेचे नियोजनाचे काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.