आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:70 विद्यार्थ्यांना यूपीएससीचे प्रशिक्षण

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अनुसूचित जातीतील ७० उमेदवारांना बार्टी संस्थेच्या वतीने संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

उमेदवारांची निवड करण्याकरिता राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई यांच्यामार्फत एकत्रित सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येत असून त्याकरिता ऑनलाइन अर्ज २५ नोव्हेंबरपर्यंत https://www.siac.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन भरता येणार आहे. उमेदवारांना बार्टी संकुल, येरवडा, पुणे येथे संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेतील पूर्व व मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...