आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारकडून तयार केल्या जात असलेल्या ओबीसी समाजाच्या इम्पिरिकल डेटामध्ये चुका आहेत हे उशीरा का होईना कबूल करणाऱ्या पालकमंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदाचे वजन वापरून हा डेटा अचूक होण्यासाठी आता तरी प्रयत्न करावेत अन्यथा तुमचे मंत्रीपद बिनकामाचे आहे हेच सिद्ध होईल, असा टाेला भाजप प्रवक्ता प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.
तीन वर्षे वेळखाऊपणा केला
प्रा. फरांदे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयात तो डेटा मान्य करणार नाही. तसे झाले तर विना आरक्षणाच्या निवडणुका होण्याची भीती निर्माण झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतीत गेल्या तीन वर्षांपासून हे सरकार निव्वळ वेळखाऊपणा करीत आहे.
फडणवीसांच्या मताला दूजोरा
सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी इम्पेरिकल डेटा चुकीच्या पद्धतीने तयार केला जातो आहे, अशी स्पष्टोक्ती दिल्याने विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्याला दुजाेरा मिळाला आहे, मंत्री सरकारमध्ये बसून करतात तरी काय असा प्रश्न निर्माण होतो असेही त्या म्हणाल्या.
एवढ्या चुका कशा होतात?
मागासवर्गीय आयोग तुमच्या सरकारच्या अधिकारात काम करत आहे, मग एवढ्या मोठ्या चुका कशा होतात? याचा अर्थ सरकारच्या सांगण्यावरूनच या चुका होत आहेत. आयोगाला राज्यात दौरे करायला सांगण्याची गरज नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने ज्या दिवशी आदेश दिला, त्याच दिवशी इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरू व्हायला पाहिजे होते. ते तर झालेच नाही पण आता आडनावावरून डेटा तयार केला जात आहे. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.