आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Vaccination 15 To 18 Child | Nashik Vaccination Centre | Marathi News | Instead Of 'co vacin', The Child Was Given 'co vishield', A Of Patoda Health Center In Yeola Taluka

धक्कादायक!:‘कोव्हॅक्सिन’ऐवजी मुलाला ‘कोविशिल्ड’, येवला तालुक्यातील पाटोदा आरोग्य केंद्रातील प्रकार

येवलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्याचे जाहीर केल्यानंतर पाटोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ वर्षाच्या मुलाला कोविशिल्ड लस देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी ही चूक आरोग्य सेविकेकडून झाली असल्याचे मान्य करत याबाबत चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

लसीकरणाला सोमवारी सर्वत्र सुरुवात झाल्यानंतर १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना ‘कोव्हॅक्सिन’ ही लस देण्यास येत आहे. तालुक्यातील पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही मुलांना लस देण्यास सुरुवात झाली. भाटगाव येथील १६ वर्षीय अथर्व वसंत पवार या मुलास येथील केंद्रात आरोग्यसेविकेने ‘कोव्हॅक्सिन’ ऐवजी ‘कोविशिल्ड’ लस दिली. या घटनेने आरोग्य विभागाचा भलथान कारभार समोर आला आहे.

अथर्व हा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदार संघ अध्यक्ष वसंत पवार यांचा मुलगा असून त्यांना आपल्या मुलास कोव्हॅक्सिन ऐवजी ‘कोविशिल्ड’ लस दिली गेल्याची माहिती मिळताच पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्यसेविका यांना झाल्या प्रकाराबाबत जाब विचारला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी देखील तातडीने आरोग्य केंद्र गाठत माहिती घेतली.

अनावधानाने आरोग्य सेविकेकडून सदर चूक झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी मान्य केले. लस घेतलेल्या अथर्व पवार या मुलाची तब्येत ठीक आहे. असा गलथानपणा पुन्हा होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य खात्याचा बेजबाबदारपणा
‘माझा मुलगा अथर्व याने सदर आरोग्य सेविकेस आपले वय १६ असल्याचे सांगितले असतानाही आरोग्य सेविकेने त्याला कोव्हॅक्सिन ऐवजी कोविशील्ड लस दिली. हा आरोग्य खात्याचा बेजबाबदारपणा म्हणावा लागेल. या प्रकरणाची गंभीर दखल घेवून चौकशी करण्यात यावी व वरिष्ठांनी यावर त्वरित कारवाई करावी. - वसंत पवार, लस घेतलेल्या मुलाचे वडील

बातम्या आणखी आहेत...