आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:आज महापालिकेच्या सर्व विभागांतील लसीकरण बंद

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या वतीने शहरातील सहाही विभागांतील आराेग्य केंद्र व इतर ठिकाणी असलेले काेराेना प्रतिबंधक लसीकरण केंद्र रविवारी (दि. २०) बंद असणार आहे. पालिकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना पहिला, दुसरा, तिसरा आणि बूस्टर डाेसचे लसीकरण रविवारी बंद ठेवण्यात येणार असल्याची सूचना करण्यात आली आहे.

यामध्ये पंचवटीतील तपाेवन शहरी प्राथमिक आराेग्य केंद्र, पूर्व प्रभागातील डाॅ. झाकीर हुसेन हाॅस्पिटल, नाशिकराेड प्रभागातील नवीन बिटकाे रुग्णालय व सातपूरच्या मायकाे सरकारी दवाखान्यातील केंद्रात लसीकरण हाेणार नाही. नागरिकांनी साेमवारी नियमितपणे लस घेण्यासाठी यावे असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...