आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:लेवा पाटीदार युवकतर्फे वल्लभभाई पटेल जयंती

सिडकाेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त सिडको भागातून मिरवणूक काढण्यात आली.सरदार वल्लभभाई पटेल आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमांचे पूजन रश्मी हिरे, सतीश पाटील, हेमंत नेहेते, सुरेश जावळे, डी.डी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सिडकाेतील त्रिमूर्ती चौक येथून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

मिरवणुकीत बहिणाबाई लेझीम पथक च्या भगिनींनी केलेले लेझीम विविध खेळ मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते. युवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष तुषार खाचणे तसेच सचिन बोंडे, अध्यक्षा रूपाली बेंडाळे, बहिणाई सखी मंडळाच्या अध्यक्षा नीलिमा नेहेते, हितेंद्र फालक, दीपक सरोदे, अमोल कोलते, रश्मी हिरे,सतीश पाटील, हेमंत नेहेते,सुरेश जावळे, डी. डी. पाटील, सुभाष चिरमाडे, विवेक गाजरे, सोपान कावळे, कमलाकर पाटील, मयूर चौधरी सातपुडा विकास मंडळ ( लेवा समाज भवन) आदी सहभागी झाले होते. सरदार पटेल यांचा राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा लढा यावर बहुमोल माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...