आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिडको भागातील विविध प्रश्न व मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सिडको विभागीय कार्यालयावर उद्या सोमवारी 12 डिसेंबर रोजी मोर्चा काढून निदर्शने करण्यात येणार आहेत.
सिडको विभागातील सामान्य, कष्टकरी, आणि कामगार राहत असल्यामुळे कोविड काळामध्ये दोन वर्ष काम धंदा नसल्यामुळे घरपट्टी पाणीपट्टी व विविध करांमध्ये सर्व सिडकोवासियांना ५०% सवलत देण्यात यावी, पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सातत्याने बॅनर लावून विद्रोपीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे त्यावर कारवाई करण्यात यावी.
चुंचाळे परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधांसह, आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरु करण्यात यावे. बाजार भाजीपाल्याचे ओटे स्थानिक रहिवाशांना अल्प दरात उपलब्ध व्हावेत. फाळके स्मारक व बुद्ध स्मारकामध्ये सातत्याने वाढणारे गवत आणि घाणीचे साम्राज्य याची नियमित साफसफाई व्हावी. पाथर्डी फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे १४ एप्रिल जयंतीदिनी, ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन, संविधान दिनी व धम्मचक्र प्रवर्तक दिनी विशेष निधी उपलब्ध होऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, फाळके स्मारक आणि बुद्ध स्मारक या ठिकाणी प्रेमयुगलांचा बंदोबस्त होण्यासाठी विशेष सिक्युरिटी गार्डची नेमणूक करण्यात यावी, गॅस पाईपलाईन साठी जागोजागी खोदण्यात येणाऱ्या सिडको परिसरातील रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, स्लम एरियातील विविध समस्यां आदींसह विविध मागण्यांसाठी हे निदर्शने करण्यात येणार आहेत.
या आंदोलनाची दखल घेण्यात न आल्याने आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे. याचवेळी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने नागरिकांना आवाहन करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.