आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोडफोड:कामाचे पैसे न दिल्याने कॉन्ट्रॅक्टरकडून तोडफोड

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामाचे पैसे दिले नाही म्हणून सबकॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या साथीदारांनी कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी संशयिताच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी समृद्धी बिल्डिंग, अशोका मार्ग येथे हा प्रकार घडला होता. याप्रकरणी प्रोनेट कंपनीचे सबकॉन्ट्रॅक्टर गोकुळ नागरे आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

रत्नाकर मिश्रा यांच्या तक्रारीनुसार, कंपनीचे एचआर मॅनेजर विनोदकुमार पांडे व सुरक्षारक्षक संजय भोजने हे ऑफिसमध्ये असताना गोकुळ नागरे व त्यांच्या साथीदारांनी कार्यालयात प्रवेश करत आमच्या कामाचे पैसे का दिले नाही असे बोलत शिवीगाळ केली व तोडफोड केली.

बातम्या आणखी आहेत...