आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला संतप्त‎:भरवस्तीत वर्षापासून पाण्यासाठी वणवण

नाशिक‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजूलाच अधिकाऱ्यांचे बंगले,‎ विश्रामगृह तेथे पाण्याची काहीच टंचाई‎ नाही मात्र शेजारीच असलेल्या‎ शासकीय वसाहतीत गेल्या दहा‎ महिन्यांपासून कमी दाबाने पाणी येत‎ असल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत.‎ चांडक सर्कल परिसरातील दगडी‎ बिल्डिंगमधील ही परिस्थिती. पुरेसे‎ पाणी मिळत नसल्यामुळे महिलांसह‎ लहान मुलांना पाण्यासाठी राेज‎ वणवण करावी लागते. सार्वजनिक‎ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना‎ निवेदने देऊनही उपयाेग हाेत‎ नसल्यामुळे शनिवारी (दि. ११)‎ सकाळी महिलांनी एकत्र येऊन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रशासनाचा निषेध केला.‎

महिलांना दैनंदिन कामासाठी पाणी‎ मिळत नसल्याने महिलांसह लहान‎ मुलांना पाणी आणण्यासाठी वणवण‎ करावी लागते. महापालिकेची जुनी‎ पाइपलाइन काढून त्या ठिकाणी नवीन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जलवाहिन्या टाकण्यात येणार‎ असल्याचे अधिकाऱ्यांकडून‎ सांगण्यात येत आहे. शनिवारी‎ महिलांनी हंडा माेर्चा काढण्याचा‎ इशारा कविता मराठे, दीपाली ढेरे,‎ उज्ज्वला ताजणे, छाया पवार, ज्योती‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ राठोड, अनंता सुकले, हर्षल पाटील,‎ पुनम मोरे, रूपाली माळी, नजराणा‎ शेख, दुर्गा नेटावटे, सविता पवार,‎ चैताली हाडपे, कविता साळुंखे, रंजना‎ राठोड, सोनाली जेजूरकर, अनिता‎ पेठकर आदी महिलांनी दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...