आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काैतुकास्पद उपक्रम:पर्यावरणपूरक उत्सवात कापडी पिशव्यांचे वाण‎

‎नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकर संक्रांतीनंतर हळदी-कुंकू‎ अनेक ठिकाणी आयाेजित केले जाते‎ पण त्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश ‎देण्याचा काैतुकास्पद उपक्रम घर‎ अंगण बहुउद्देशीय संस्थेने राबविला. संस्थेच्या महिलांनी स्वत: घरी‎ कापडी पिशव्या बनवून‎ हळदी-कुंकवाचे वाण म्हणून त्या‎ इतर महिलांना भेट दिल्या.‎ प्लास्टिकमुक्तीतून पर्यावरण‎ रक्षणाचा माेठा संदेश यातून‎ समाजापर्यंत पाेहाेचविण्याचा हा‎ प्रयत्न महत्त्वाचा म्हणून मानला जात‎ आहे.

संस्थेच्या अध्यक्षा आशा‎ भाेइर यांच्या अध्यक्षतेखाली‎ झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी‎ आपला घर प्रपंचाला हातभार लावता‎ येईल यासाठी मार्गदर्शन केले.‎ उपाध्यक्षा नीलम पानपाटील, सचिव‎ नलिनी पाटील यांनी कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन केले. खजिनदार पूनम‎ भाेइर यांनी यांनी शिवणकामाबद्दल‎ मार्गदर्शन केले. व्यवस्थापिका‎ एेश्वर्या पगारे व साेनल आढाव यांनी‎ कार्यक्रमाचे नियाेजन केले. अनेक‎ महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती‎ लावली.‎

बातम्या आणखी आहेत...