आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी दिनानिमित्त शहरात विविध उपक्रम; यात सहभागी व्हावे असे आवाहन स्मृती शताब्दी दिनानिमित्त स्थापन झालेल्या समितीने केले आहे

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजर्षी शाहू महाराजांनी नाशकात तीन वसतिगृहांची निर्मिती करत त्यांना आर्थिक मदतही केली. या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने यानिमित्ताने राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृती शताब्दी कार्यक्रम शुक्रवारी (दि. ६) होणार आहे. यावेळी नाशिकमधील तीनही वसतिगृहांमध्ये अभिवादन करण्यात येणार आहे. यात सहभागी व्हावे असे आवाहन स्मृती शताब्दी दिनानिमित्त स्थापन झालेल्या समितीने केले आहे.

१५ एप्रिल १९२०, शाहू महाराजांनी नाशिकला भेट दिली होती. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून तीन वसतिगृहांची निर्मिती करण्यात आली होती. त्यातील उदोजी मराठा बोर्डिंग, वंजारी बोर्डिंग आणि छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग या वसतिगृहांना महाराजांनी भेट देऊन अर्थसहाय्य दिले आहे. नाशिक शहरातील विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समितीची निर्मिती केली आहे.

या समितीतर्फे ६ मेला सकाळी १० वाजता उदोजी मराठा बोर्डिंग, गंगापूररोड, मराठा विद्या प्रसारक समाज संस्था कार्यालयासमोरील शाहू महाराज पुतळा येथे साडेदहा वाजता वंजारी बोर्डिंग गंगापूररोड येथे सकाळी ११ वाजता आणि छत्रपती शाहू बोर्डिंग येथे १२ वाजता अभिवादन केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...