आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप प्रणित युनिक ग्रुपतर्फे द्राक्ष महोत्सव व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने द्राक्षापासून पदार्थ व दागिने बनवण्याची स्पर्धा झाली. महिलांना स्वयंराेजगाराचे आवाहन यानिमित्त करण्यात आले. राजीवनगर येथील कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माधुरी पाटील, भीमा जोंधळे, डॉ. शीतल गुप्ता, डॉ. राजश्री धोंगडे, अॅड. सोनाली सूर्यवंशी, सुरेखा संधान, प्रज्ञा तोरस्कर, ज्योती पिंगळे, ऋचा देशपांडे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. द्राक्षापासून बनवलेली चटणी, लोणचे, बर्फी, मोदक, अंगूर ड्रायफ्रूट बर्फी, गोड पुरीसह ३० ते ३२ पदार्थ बनवत स्पर्धकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ११ महिलांनी द्राक्षापासून बनवलेले दागिने परिधान केले होते.
स्पर्धेचे परीक्षण शेफ विष्णू मनोहर, प्राजक्ता शहापूरकर यांनी केले. या स्पर्धातील विजेत्या वंदना दिवाणे, अनिता वडनगरे, माधुरी भांबरे, योगिता निफाडे, राजू परिहार, तुती धवन, शीतल करवा, वर्षा संत, नीलिमा पूरकर, अर्चना राठोड यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. हास्य कलाकार भारत गणेशपुरे, योगेश शिरसाठ यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे आयोजक माजि नगरसेवक सतीश सोनवणे, व महिला ग्रुपच्या अध्यक्षा अनिता सोनवणे, ग्रुपचेअध्यक्ष शलेश कुलकर्णी, भावना गवळी, अॅड. श्याम बडोदे, अनिकेत सोनवणे, जयश्री महाले, रेणुका मराठे, अमोल गोऱ्हे, कल्पना बारस्कर, राजश्री वाघ, सानिका सोनवणे, जयश्री महाले, मीलन हेगडे, सुवर्णा गांगुर्डे, अलका रकिबे, प्रीती जैन उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.