आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक वारसा सप्ताह:राज्य संरक्षित स्मारकांचे छायाचित्र आणि दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन, सरकारवाड्यात भरगच्च कार्यक्रम

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग आणि अभिरक्षक, प्रादेशिक वस्तुसंग्रहालयाच्या वतीने १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत जागतिक वारसा सप्ताहानिमित्त राज्य संरक्षित स्मारकांचे छायाचित्र प्रदर्शन, दुर्मिळ वस्तूचे प्रदर्शनाचे आयाेजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात रविवारी दि. २० सकाळी १० ते ३ या वेळेत ७ वी ते ९ वी या इयत्तेतील मुलांसाठी इंटेक नाशिक चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने वॉल पेंटिंग - आणि बोहाडा मुखवटा बनवण्याचे तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मस्थळ असलेल्या भगूर येथील वाड्यामध्ये श्रीमद भगवतगीता पठण देखील करण्यात आले.

साेमवारी २१ नोव्हेंबर रोजी युट्युब चॅनलच्या माध्यमातून डॉ. माया पाटील-शहापूरकर यांचे भारतीय मंदिर स्थापत्य या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वा. वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदर हस्ताक्षर मोडी लिपी स्पर्धा, प्रत्यक्षात सरकारवाडा येथे आयोजित करण्यात येणार आहे.२३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा. मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक युट्युब लाईव्हच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वा. युट्युब लाईव्ह च्या माध्यमातून प्राचीन पर्शियन क्यूनिफॉर्म व भाषेचा इतिहास आणि आवश्यकता यावर शैलेश क्षीरसागर हे मार्गदर्शन करणार आहेत.

त्यासोबतच दि १९ ते २५ या कालावधीत राज्य संरक्षित स्मारक असलेल्या नीळकंठेश्वर मंदिर (नाशिक), रंगमहाल (चांदवड), साल्हेर किल्ला (बागलाण), अंकाई किल्ला (येवला), सरकारवाडा (नाशिक), वैजनाथ महादेव मंदिर (सिन्नर), या राज्य संरक्षित स्मारकांवर तसेच धर्मवीरगड किल्ला (श्रीगोंदा, अहमदनगर) या असंरक्षित स्मारकावर सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.

या माध्यमातून तरुण पिढीला या स्थळाबाबत माहिती प्राप्त होणार आहे.जास्तीत जास्त नाशिककरांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...