आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीडीओ मेरी शाळेत‎ प्रा.नागमाेती यांचा संवाद‎‎:जिज्ञासू वृत्तीचा अंगीकार करण्याची‎ शिकवण वीर सावरकरांनी दिली‎

नाशिक‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रत्येक‎ बाब बुद्धी आणि तर्काच्या कसोटीवर‎ यशस्वी केली. जिज्ञासू वृत्तीचा‎ अंगीकार करणे, प्रत्यक्षात येणारी‎ कोणतीही नवी गोष्ट स्वीकारण्याची‎ मानसिकता बाळगणे हीच वैज्ञानिक‎ दृष्टिकोनाची लक्षणे सावरकर यांनी‎ सांगितल्याचे प्रतिपादन शिक्षणशास्त्र‎ महाविद्यालयाचे प्रा. पंकज नागमाेती‎ यांनी केले.‎ राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नाशिक‎ एज्युकेशन साेसायटीच्या सीडीआे‎ मेरी हायस्कूलमध्ये आयाेजित‎ कार्यक्रमात विज्ञाननिष्ठ सावरकर या‎ विषयावर प्रा.नागमाेती यांनी पुष्प‎ गुंफले.

सावरकर यांचे क्रांतीकारक हे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ एकच रूप विद्यार्थ्यांना माहित असले‎ तरी त्याबराबेरीनेच ते विज्ञाननिष्ठ‎ असल्याचे दुसरे अंग महत्वाचे आहे.‎ बुद्धी ही सृष्टीतल्या सर्व सजीवांपेक्षा‎ मानवाला श्रेष्ठत्व देणारी बाब आहे.‎ प्राचीन ग्रंथातून जे लिहिलेले आहे ते‎ वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर पारखून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मगच स्वीकारायचे, असे स्पष्ट मत‎ सावरकरांनी मांडले. विवेक निष्ठा हा‎ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक पैलू‎ सावरकरांनी ठेवल्याचे नागमाेती‎ म्हणाले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी सुनील सबनीस यांनीही‎ मागदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...