आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीज कर्मचारी संपाचा फटका सामान्य नागरिकांना बसला. बुधवारी (दि. ४) सकाळपासूनच आरटीओ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागला. आरटीओ कार्यालयातील वाहन फिटनेस चाचणी केंद्रातील जनरेटरमधील डिझेल संपल्याने दुपारी दीडपर्यंत केंद्रातील सर्व काम ठप्प झाले होते. यामुळे वाहनांच्या रागा केंद्राबाहेर लागल्या हाेत्या. राज्यातील पहिली अद्ययावत फिटनेस चाचणी यंत्रणा नाशकातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात बसविली अाहे. सकाळपासूनच या भागात वीज नसल्याने तसेच, जनरेटरमधील डिझेलही सकाळपासूनच संपल्याने केंद्रातील काम ठप्प झाले होते. यामुळे केंद्रा बाहेर वाहनांच्या रागा लागलेले दिसून आले. दुपारी दीडला वीजपुरवठा सुरळित झाल्यानंतर वाहनांच्या फिटनेसलाही सुरुवात झाली.
अपॉईंटमेंट घेणाऱ्या वाहनचालकांचे हाल या चाचणी केंद्रावर केवळ व्यावसायिक (कमर्शियल) वाहनांचीच येथे तपासणी केली जात आहे. या केंद्रामध्ये थ्री व्हीलर्स, लाईट व्हेईकल्स, हेव्ही व्हेईकल्स आणि अवजड वाहनांसाठी वेगवेगळे असे एकूण चार ट्रॅक करण्यात आले. प्रत्येक ट्रॅकवर वाहनाला पीयूसी टेस्ट, ब्रेक आणि तिसऱ्या टप्प्यात हेडलाइटस, स्टेअरींग प्ले, सस्पेशन चाचणीला सामोरे जावे लागते. संगणक यंत्रणेच्या माध्यमातून या सर्व तपासण्या केल्या जात असून आरटीओकडून अपॉईंटमेंट घेणाऱ्या वाहनांचीच तपासणी केली जाते. मात्र, बुधवारी अपॉईंटमेंट घेणारे वाहनचालकांचे ही प्रचंड हाल झाले असून अनेकांना पुढील तारखेचा अपॉईंटमेंट देण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.