आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षणातून 20 विद्यार्थ्यांना वाहन निर्मितीचे धडे

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संदीप पॉलिटेक्निक महाविद्यालयात मार्च २०१६ पासून टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीकडून अत्याधुनिक ट्रेनिंग सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यासाठी काॅलेज आणि कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यानुसार टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्राम अंतर्गत २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना वाहन निर्मितीचे धडे देण्यात आले.

पाॅलिटेक्निक डिप्लोमा झाल्यानंतर या प्रशिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना आॅटोमोबाइल क्षेत्रात नोकरी व व्यवसाय करताना होतो. आतापर्यंत १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण सत्रात सहभाग घेतला आहेत. टोयोटा टेक्निकल एज्युकेशन कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ च्या नवीन बॅचच्या निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. या विद्यार्थ्यांना या प्रशिक्षण कार्यक्रमात काैशल्य विकासाचे धडे देण्यात आले.

या प्रशिक्षण सत्राचे उदघाटन वासन कंपनीचे व्यवस्थापक (ग्राहक सेवा) श्रीकांत नायक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्राचार्य प्रा.पंकज धर्माधिकारी, विभागप्रमुख जे. आर. वाडिले, ट्रेनर प्रा. महेश थोरात, कंपनीतील टेक्निकल लीडर संतोष सानप आदी उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गातून राेजगाराचे धडे मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...