आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:विहिंपचे महामंत्री परांडे आज नाशिक दाैऱ्यावर ; बांधकाम व्यावसायिकांचे योगदान’ विषयावर करणार चर्चा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे २० व २१ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्याच्या दाैऱ्यावर येत आहेत. मंगळवारी (दि. २०) दुपारी ४ वाजता संत संमेलन व सायंकाळी ६ वाजता बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांबरोबर ‘हिंदू राष्ट्रनिर्मितीमध्ये बांधकाम व्यावसायिकांचे योगदान’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष विराज लोमटे, जिल्हा समन्वयक माधवदास राठी महाराज यांनी केले आहे. २१ डिसेंबर रोजी हरसूल येथील मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन व दुपारी ४ वाजता त्र्यंबक येथे संतांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...