आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर नात्यातल्या व्यक्तीने केला अत्याचार:पीडिता 22 आठवड्यांची गर्भवती; संशयितावर गुन्हा दाखल

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीला शहर दाखवण्याच्या बाहण्याने नात्यातल्या व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच पीडिता 22 आठवड्याची गर्भवती राहिली आहे.

याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताचे नाव मुलगी सांगत नसल्याने यामागे घरातील व्यक्ती असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मुलीला जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील रहिवाशी आहे. गावातील शाळेत शिक्षण घेते. मुलीला जवळचा नातेवाईक असलेल्या इसमाने नाशिक शहरात खरेदी करण्याचा बहाणा करत तीला मखमलाबाद येथे घेऊन आला. परिसरातील एका नविन इमारती मध्ये असलेल्या फ्लॅट मध्ये घेऊन जात तीच्यावर अत्याचार केला. याबाबात कुणास काही सांगीतले तर जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेला प्रकार कुणास न सांगता मुलगी शांत होती. या संबधातून मुलीलाल गर्भधारणा झाली.

हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला. याबाबत विचारणा केली असता मुलीने काहीच सांगीतले नाही. मुलीस धमकी दिल्याने तीने संशयिताचे नाव घेतले नाही. तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार करण्यात आली. गुन्हा शहर पोलिसांच्या हद्दीत घडल्याने गुन्हा म्हसरुळ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. वरिष्ठ निरिक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

पीडित मुलीचा गर्भपात

पीडित मुलीचे वय लहान आहे. ती 22 आठवड्याची गर्भवती असल्याने जिल्हा रुग्णालयात तीला दाखल करण्यात आले. नुकतेच तीचा कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर गर्भपात करण्यात आला.

नात्यातील व्यक्तीचे कृत्य

पीडित मुलीला शहरात घेऊन येण्याचा बहाणा करत मुलीवर अत्याचार करणारा संशयित हा नातेवाईक असण्याची शक्यता आहे. पीडितेला काही तरी धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

समुपदेशन करणार

मुलीने महिला व बाल कल्याण विभागाकडून समुपदेशन केले जाणार आहे.मुलीला विश्वासात घेऊन संशयिताचे नाव समजणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...