आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलांच्या गटात यश भंडारी याने अंतिम फेरीत राघव महाले याचा 3-0 असा सहज पराभव केला तर यशने 13 वर्षाखालील मुलांच्या गटात आर्य छाजेड याचा 3-1 ने पराभव करून दुहेरी मुकुट पटकावला.
11 वर्षाखालील मुलींच्या गटात केशीका पूरकर हिला ओवी रहाणे हीने पुढे चाल दिल्यामुळे विजयी घोषित करण्यात आले तर 13 वर्षाखालील मुलींच्या गटात स्वरा करमरकर हीने अंतिम फेरीत ईरा गोगटे हीचा 3-0 असा सरळ गेम जिंकून अजिंक्यपद पटकावले. 15 वर्षाखालील मुलांच्या गटात राजनीश भराडे याने हर्ष बोथरा याचा 3-1 असा पराभव करुन विजेतेपद मिळविले तर मुलींच्या गटात स्वरा करमरकर हीने स्वधा वालेकर हीचा 3-0 असा सहज पराभव करून या स्पर्धेतील दूसरे विजेतेपद आपल्या नावावर केले.
17 वर्षाखालील मुलांच्या गटात अन्वय पवार याने अंतिम फेरीत अर्चित रहाणे याचा 3-0 असा सरळ गेम जिंकून विजेतेपद आपल्या नावावर केले. तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या गटात जानव्ही कळसेकर हीने अटीअटीच्या लढतीत मिताली पुरकर विरुद्ध 3-2 असा विजय मिळवित विजेतेपद पटकावले.
19 वर्षाखालील मुलांच्या गटात अर्चित रहाणे याने अन्वय पवार याचा 3-1 असा पराभव करून 17 वर्षाखालील गटातील पराभावचा वचपा काढत या गटाचे विजेतेपद मिळविले.19 वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत बरे नसल्याने अनन्या फडके हीने सामना सोडल्यामुळे मिताली पूरकरला विजयी घोषित करण्यात आले. पुरुष एकेरीत पुनीत देसाई याने अंतिम फेरीत अजिंक्य शिंत्रे याचा 3-2 असा चुरशीच्या सामन्यात पराभव करून पुरुष गटाचे विजेतेपद मिळविले तर महिला गटात मिताली पूरकर हीने जानव्ही कळसेकर हीचा 3-0 असा सहज पराभव करून विजेतेपद आपल्या नावे केले.
40 वर्षावरील वयोगटात देवेंदु चांदोरकर याने अंतिम फेरीत अमोल सरोदे याचा 3-0 असा सहज पराभव करून विजेतेपद आपल्या नावे केले तर 50 वर्षावरील वयोगटाच्या झालेल्या अंतिम सामन्यात संदीप भागवत यांनी अंतिम फेरीत प्रवीण कुलकर्णी यांचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांच्या शुभहस्ते पार पडला. मोठ्या गटातील विजेत्या खेळाडूंना रोख तर लहान गटातील खेळाडूंना चषक देऊन गौरविण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.