आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षानंतर निघणार ‘जश्न ए गौसे आझम’ची मिरवणूक:शहरात जय्यत तयारी सुरू; मशिदींसह घरोघरी सजावटीला वेग

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेले गौस-ए-आझम हजरत शेख अब्दुल कादीर जिलानी रहेमतुल्लाअलैही यांच्या ग्यारवी शरीफ सण सोमवारी (7 नोव्हेंबरला) शहरात साजरा केला जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात ग्वारवी शरीफची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. विविध सामाजिक संस्था व मित्रमंडळांकडून आपआपला परिसर सजविला जात असून, मशिदींवरही आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

दरवर्षी इस्लामी कालगणनेतील ‘रबीऊल आखेर’ या उर्दू महिन्याच्या 11 तारखेला ग्यारवी शरीफ साजरी केली जाते. यावर्षीदेखील घरोघरी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्वारवी शरीफनिमित्त मुस्लीम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, समाजबांधवांनी आपली घरे, दुकाने व परिसर रोषणाईने सजविला आहे. ठिकठिकाणी पैगंबरांनी दिलेला मानवतेचा व एकात्मतेचा संदेश व मदिना शरीफच्या प्रतिकृतींचे फलक उभारले जात आहेत. वडाळागाव, जुने नाशिक, देवळाली कॅम्प, देवळालीगाव, नाशिकरोड, सातपूर, सिडको आदी परिसरात ग्यारवी शरीफनिमित्त उत्साहाचे वातावरण असून, परिसर विविध आकर्षक पद्धतीच्या रोषणाईने नटला आहे. हिरवे झेंडे, पताका, रोषणाई करून परिसर सुशोभित करण्यावर भर दिला जात आहे. जुने नाशिकसह वडाळागाव परिसरातील सर्वच मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

विद्युत रोषणाईच्या कामांना सुरुवात

7 नोव्हेंबरला जुने नाशिक परिसरातून गौस-ए-आझम हजरत शेख अब्दुल कादीर जिलानी रहेमतुल्लाअलैही यांच्या ग्यारवी शरीफ सणानिमित्त जुलुस-ए- गौसिया यांची मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे ग्यारवी शरीफ निमित्त काढण्यात येणारे जुलुसच्या पारंपारिक मार्गावर स्वागत कमानी व सजावटीसह विद्युत रोषणाईच्या कामांना सुरुवात करण्यात आलेली आहे.

सजावटीच्या कामाला वेग

मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेले गौस-ए-आझम हजरत शेख अब्दुल कादीर जिलानी रहेमतुल्लाअलैही यांच्या ग्यारवी शरीफ सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. यानिमित्त जुने नाशिकसह परिसरात सजावटीच्या कामाला वेग आला आहे. यासाठी लागणारे विविध प्रकारचे आकर्षक हिरवे झेंडे, पताका, चमकी, विद्युत माळा आदी सजावटीच्या साहित्याने जुन्या नाशकातील बाजारपेठ गजबजली आहे. जुने नाशिकसह मेनरोड परिसरात विद्युत साहित्यविक्रीच्या दुकानांवर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. जुने नाशिक भागात जयंतीचा उत्साह पहावयास मिळत असून,ठिकठिकाणी सजावटीच्या कामाला वेग आला आहे.

बातम्या आणखी आहेत...