आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Vidarbha Development Council Tuesday, Maharashtra Chamber And Department Of Industries Will Hold Vidarbha Development; Shinde Fadnavis Will Be Present

मंगळवारी विदर्भ विकास परिषद:महाराष्ट्र चेंबर अन् उद्याेग विभागाकडून विदर्भ विकासाचे धाेरण ठरणार; शिंदे-फडणवीस असणार उपस्थित

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँण्ड अँग्रीकल्चर" सह राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ विकास परिषद बुधवार दि. 21 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे, ही माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँण्ड अँग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. ही परिषद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदयोगमंत्री उदय सामंत, यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विषयातील मान्यवर तज्ञ वित्तीय संस्थांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

महाराष्ट्र सरकारचा उद्योग विभाग, सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्योग (एमएसएमई), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि महाराष्ट्र सरकारचा औद्योगिक संचलनायाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृह, आमदार निवास, सिव्हील लाईन्स येथे सकाळी साडेनऊ वाजता परिषदेची सुरुवात होईल. तिसर्या सत्रात विदर्भ विकासाचे ठोस धोरण ठरविले जाणार आहे.

या विदर्भ परिषदेच्या आयोजनामध्ये सहयोगी संस्था म्हणून एमइडीसी, विदर्भ इंडस्ट्री असोसिएशन, फेडरेशन ऑफ इंडस्ट्री असोसिएशन विदर्भ, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, एमआयडीसी असोसिएशन अमरावती, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ,चेंबर ऑफ अमरावती महानगर यांच्यासह अकरा जिल्ह्यातील विविध व्यापारी औद्योगिक संघटना सहभागी होणार आहेत आहेत. परिषदेचे नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, भंडारा, वाशिम, बुलढाणा, गडचिरोली जिल्ह्यातील सर्व व्यापारी, उद्योजक संघटना, पदाधिकारी आणि सदस्य सहनिमंत्रक आहेत.

5 महत्वाच्या विषयांवर हाेणार चर्चा

दिवसभर होणार्या या विकास परिषदेत उद्योग, व्यापार, कृषी, ऊर्जा, इनोव्हेशन या पाच महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. विदर्भाच्या विकासासाठी महत्वाची पाऊले, निर्णय आणि ठोस धोरण या परिषदेत ठरविले जाणार आहे. विदर्भाच्या विकासासाठी विविध प्रकारचे उद्योग, व्यापार, कृषी विभागासाठी विविध योजना, ऊर्जा आणि नवनिर्मितीचे संकल्प परिषदेत मांडले जाणार आहेत. उद्योगासह अन्य विभागासाठी राज्य सरकारकडून विविध प्रकारच्या असलेल्या योजनांची माहिती परिषदेत दिली जाणार आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यातून सुमारे दोन हजारांहून अधिक व्यापारी, उद्योजक या परिषदेत सहभागी होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...