आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'देशात भम्रित करावे सकळ जन'चा रेशीमबाग पुरस्कृत कार्यक्रम जोरात सुरु असल्याचा घाणाघात ‘गांधी का मरत नाही’ या पुस्तकाचे लेखक, 17व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे यांनी केला. वर्ध्यातील सर्कस मैदानात विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन त्यांनी सरकारला खडेबोल सुनावत आपण बोललो पाहिजे या गदारोळात आपली होरपळ करुन न घेता अन्यायाला वाचा फोडली पाहिजे असे ते म्हणाले.
चंद्रकांत वानखेडे म्हणाले, वातावरणात परस्पर अविश्वास आणि जाती-जातीत धर्माधर्मात भयाचे वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मलूभूत प्रश्नांवरुन लक्ष हटविण्यासाठी सरकारी पातळवरुनच हा प्रत्यत्न केला जात आहे. लव्ह जिहाद, हिजाब, भोंगे, हनुमान चालिसा याला झणझणीत हिंदुत्त्वाची फोडणी आणि हिंदू खतरे में है च्या सातत्याने चहुबाजूकडून उठविण्यात येणाऱ्या आरोळ्या हिंदूंची घटती व मुस्लिमांची वाढती लोकसंख्या याची भीती दाखवून स्त्री म्हणजे मशीन आणि पुरुष म्हणजे त्या मशीनवर काम करणाा कामगार असे बिंबवले जात आहे.
वरखडे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- उर्फीचा वाद ती जावेद आहे म्हणूनच उकरला गेला आहे. मिलिंद सोमण, मधू सप्रे, राधिका यांचा नागडेपणा दिसला नाही.
- कधी टिकली, कधी कपडे, कधी पठाण सिनेमा... यात मुद्दा दीपिकाच्या कपड्यांचा होता मात्र बहिष्कार शहारुख खानवर.
- श्रद्धाचे तुकडे करणारा मुस्लिम, मशिदीत शिवलिंग सापडल्याचे प्रकार, लव्ह जिहाद, हिजाब, भोंगे, हनुमान चालिसा याला हिंदुत्वाची फोडणी दिली जाते.
- घरात घुसून मुसलमान मुलीबाळींवर अत्याचार करतील त्या,मुळे कायम धारदार शस्त्र बाळगा असा सल्ला विद्यमान खासदार प्रज्ञा ठाकूर देतात हे लांच्छनास्पद आहे.
-संशयाचे, भयाचे वातावण निर्माण केले की, महागाई, शेततकरी आत्महत्या, वगैरे प्रश्न अपसूकच मागे पडतात, असे वतावरण निर्माण केले जात आहे.
- सुरेश द्वादशीवार यांनी सावरकरांबद्दल काय वक्तव्य केले तर अ. भा. साहित्य संमेनलनात अध्यक्षपदावरुन वाद होतो.
- आज साहित्य संस्थानांनाही दहशतीच्या वातावरणात काम करीत आहेत. सरकारी अनुदानाच्या दबावाखाली साहित्यिक संस्था लाचार झाल्या आहेत का अशी शंका येते.
-संस्कृत ऐवजी मराठीचा उपयोग हा काही संस्कृत भाषेविरुद्धचा ज्ञानेश्वरांचा पवित्रा नव्हता तर संस्कृतवर मालकी हक्क प्रस्थापित केलेल्या पंडितांचा तो विद्रोह होता.
- वारकरी पंथाने वेदांवर टीका नाही पण नामवेद हाच श्रेष्ठ मानला. देव नामस्मरणाने प्रसन्न होतो आणि नामस्मरणाला ना देवाची मूर्ती लागत ना त्याची पूजा. मग देव नाही तर पुजारीही नाही. पुजारीच नाही तर दक्षिणा नाही. त्यामुळे वारकरी पंथाने ब्राह्मणशाहीच्या पाठीवर न मारता डायरेक्ट पोटावरच पाय दिला.
- इतिहास घडिवण्याची औकात हिंदुत्त्ववाद्यांमध्ये कधीच नव्हती; पण इतिहासाची माेडताेड करुन जनतेसमाेर सादर करण्याची क्षमता मात्र दांडगी हाेती आणि आही आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.