आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बुद्धांच्या विचारांचे भित्तिचित्रातून दर्शन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गौतम बुद्ध हे शांतता समरसतेचे प्रतीक आहेत. प्रेम संतुलन आणि सकारात्मक ऊर्जा याचे ते एक दिव्य व्यक्तिमत्त्व आहे. आपण त्यांचे स्मरण फक्त शुभ दिवशी करतो. मात्र जर आपल्या भोवताली त्याची उपस्थिती भित्तिचित्र आणि शिल्पांच्या स्वरूपात असेल तर त्याच्या शिकवणुकीची आठवण सतत आपल्या सोबत राहील, या एका वेगळ्या दृष्टिकोनातून बुद्धांना सर्जनशील रूपाने नाशिकच्या अनुराधा चव्हाण यांनी मेराकी, द सोल क्रिएशन प्रदर्शनातून मांडले आहे. मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत मंगळवारी (दि. ३०) अभिनेते राजेश पुरी आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. लोकमत मीडिया ग्रुपचे अध्यक्ष विजय दर्डा, भारतीय महसूल सेवा अधिकारी आणि एनसीबीचे माजी मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रसिकांसाठी ५ सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

या प्रदर्शनातील चित्र, शिल्प याची माहिती पुरी दांपत्याने जाणून घेतली. अनुराधा चव्हाण या शिल्पे आणि भित्तिचित्रे तयार करण्यात पारंगत आहे. गाेविंदनगरातील अनुत्तरा आर्ट स्पेस हा त्यांचा स्टुडिओ आणि गॅलरी आहे. मेराकी द सोल क्रिएशन या प्रदर्शनात त्यांनी त्यांची आवडती बुद्ध ही थीम प्रदर्शित केली आहे. संस्कृती आणि परंपरा लोप पावत चालल्या आहेत, त्या भावी पिढीसाठी आपण जपल्या पाहिजेत. तेच या प्रदर्शनातून दाखविण्याचा हेतू असल्याचे चव्हाण सांगतात. ५ सप्टेंबरपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनाला रसिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...