आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्चर्य व्यक्त:दक्षता जनजागृती सप्ताह ; प्राचार्यांनीच स्वीकारली 30 हजार रुपयांची लाच

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सचिव तथा प्राचार्यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. २) रंगेहाथ पकडले. नीलेश बबन ठाकूर (४०, रा. फ्लॅट नंबर १४, हरे कृष्णा अपार्टमेंट, स्वामी समर्थनगर, आडगाव शिवार, नाशिक) असे त्यांचे नाव आहे. भ्रष्टाचारमुक्त राष्ट्रासाठी दि. ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या काळात दक्षता जनजागृती सप्ताह सुरू आहे. या सप्ताहातच लाचेच्या दाेन घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नीलेश ठाकूर हे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर या संस्थेत सचिव तथा प्राचार्यपदावर असून तक्रारदार यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नरच्या इमारतीचे ब्रिक बॅट कोबा व वॉटरप्रूफिंगचे काम इ-निविदेद्वारे घेतले होते. त्याचे ११ लाख ५१ हजार २९८ रुपये मंजूर केल्याच्या मोबदल्यात प्राचार्य ठाकूर यांनी तक्रारदाराकडे तीन टक्के रकमेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन. एस. न्याहळदे यांच्या पथकाने सापळा रचून प्राचार्य ठाकूर यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी ठाकूर यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...