आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत किशनलाल शर्मा यांचे मार्गदर्शन‎:मनोबल वाढण्यासाठी विहंगम‎ योगसाधना अतिशय उपयुक्त‎

नाशिक‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विहंगम योगाच्या अद्‌भुत योग साधनेने‎ नकारात्मकता, नैराश्य दूर होऊन मनोबल‎ वाढण्यास मदत होते. मनोकायिक आजारांवर‎ हा याेग रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन‎ विहंगम योगाचे राष्ट्रीय संत किशनलाल शर्मा‎ यांनी केले. दिंडोरी येथे आयोजीत केलेल्या‎ ‘विहंगम योग : तत्त्वज्ञान व ध्यानसाधना ’ या‎ विषयावर ते बोलत होते. त्यांच्या‎ सत्संग-प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी विविध‎ क्षेत्रातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती‎ होती.‎ ‎

संत किशनलालजींच्या ओजस्वी वाणीतून‎ विहंगम योगाच्या तत्त्वज्ञानाची माहिती दिली व‎ शेवटी उपस्थितांना ध्यान साधनाही‎ शिकवण्यात आली. ४ आणि ५ फेब्रुवारीला‎ नाशिकमध्ये हाेणार असलेल्या दोन दिवसीय‎ राज्यस्तरीय भव्य आध्यात्मिक सोहळ्याचे‎ आमंत्रण सर्वांना दिले.‎ पहिल्या दिवशी विहंगम योगाचे वर्तमान‎ सदगुरुश्री स्वतंत्रदेवी महाराज व उत्तराधिकारी‎ पूज्य संतप्रवर श्री विज्ञानदेव महाराज यांच्या‎ अमृत वाणीचा लाभ घेता येईल तर दुसऱ्या‎ दिवशी सकाळी १००१ कुण्डीय विश्वशांती‎ वैदिक यज्ञाचे भव्य आयोजन करण्यात‎ आलेले आहे. सर्व अध्यात्मप्रेमीं या अभूतपूर्व‎ संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात‎ आले. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध नियोजन माजी‎ नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते माधवराव‎ साळुंखे यांनी केले.‎ विहंगम याेगसाधनेबाबत यावेळी शर्मा यांनी‎ सखाेल मार्गदर्शन केले. यामध्ये साधनेचा‎ विधी त्यांनी विस्तारपूर्वक सांगितला. या‎ याेगसाधनेने नकारात्मकता दूर हाेऊन‎ सकारात्मकता वाढते , असे त्यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...