आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक 18 डिसेंबर, 2022 रोजी नाशिक जिल्हा स्तरीय विक्रांत हैप्पी होम क्रॉस कंट्री स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत पुरुष आणि महिला खुला गट, 20 वर्षे आतील मुले- मुली, 18 वर्षे आतील मुले- मुली, आणि 16 वर्षे आतील मुले- मुली या चार विविध वयोगटाच्या समावेश आहे. या स्पर्धेचे उदघाटन रविवारी सकाळी 6.00. वाजता विक्रांत हैप्पी उद्योग समूहाचे संचालक गंगाधर जाधव यांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी विक्रांत हैप्पी होम या उद्योग समूहाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच इतरही क्रीडा प्रेमींनीही या स्पर्धाच्या आयोजनासाठी सहकार्य केले आहे.
या क्रॉस कंट्री स्पर्धेचा मार्ग गंगापूर रोड येथील निर्मला कॉन्व्हेंट स्कुलपासून ते मखमलाबाद लिंक रोड, आणि परत असा असणार आहे. पुरुष आणि महिला या खुल्या गटासाठी धावण्याचे आंतर हे 10 किलोमीटर असणार आहे. तर 20 वर्षे आतील गटासाठी आठ किलोमीटर, 18 वर्षे आतील गटासाठी सहा किलो मीटर आणि 16 वर्षे आतील गटासाठी दोन किलो मीटर असे आंतर असणार आहे. या स्पर्धाचे आयोजन ऑल इंडिया ऍथलेटिकस असोसिएशन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या क्रीडा विभागाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार होणार आहेत.
या स्पर्धेत 14 वर्षे अतिल खेळाडूंना सहभागी होता येणार नाही. तर 16 वर्षाआतील गटासाठी जन्मतारीख नऊ जानेवारी 2007 ते आठ जानेवारी 2009 दरम्यान असावी, 18 वर्षे वयोगटासाठी जन्मतारीख नऊ जानेवारी 2005 ते आठ जानेवारी 2007 दरम्यान असावी, तर 20 वर्षे गटासाठी जन्म तारीख नऊ जानेवारी 2003 ते आठ जानेवारी 2005 दरम्यान असणे आवश्यक आहे. वयोगटासाठी खेळाडूंनी आपला जन्मतारखेचा मूळ दाखला, 10 वी उत्तीर्ण खेळाडूंनी 10 वी पास झाल्याचे प्रमाणपत्र देणे अवश्यक आहे
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे या चार गटांच्या खेळाडूंची नाशिक जिल्हा संघात निवड करण्यात येणार आहे. हे निवड झालेले खेळाडू दिनांक परभणी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधेत्व करतील. तरी नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे अवाहन नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनचे चेअरमन हेमंत पाटील आणि सचिव सुनील तावरगीरी यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.