आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:गाेवानिर्मित ९० लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्यासाठा वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून ८९ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मद्यसाठा पकडण्यात आला. मुंबई-आग्रा रोडवर एका हाॅटेलच्या समोर पाडळी (ता. इगतपुरी) शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. ट्रकचालक सचिन बाळासाहेब भोसले (रा. मोहोळ सोलापूर) यास अटक करण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विभागाचे भरारी इगतपुरी शिवारात गस्त करत असताना पाडळी शिवारात ट्रकची तपासणी सुरू असताना एमएच ४० वाय ४४६७ या क्रमांकाच्या ट्रकची चेकिंग केली असता गोवानिर्मित विदेशी मद्यसाठा असलेले ६९४ बाॅक्स आढळून आले. ट्रकसह ८९ हजार ९३ हजारांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. हा मद्यसाठा जिल्ह्यात वाटप करण्यासाठी आणण्यात आला असावा अशी शंका आहे.

बातम्या आणखी आहेत...