आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे सांगली, सोलापूर जिल्ह्यातली गावे कर्नाटकात जाण्याची मागणी करतायत. नांदेड जिल्ह्यातल्या गावांना तेलंगणात जायचे आहे, तर आता नाशिक जिल्ह्यातल्या 55 गावांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये जाण्याची मागणी केलीय. त्यामुळे नवा वाद सुरू झालाय.
विशेष म्हणजे हे गावकरी इथवरच थांबले नाहीत. तर त्यांनी गुजरातमधल्या वासदाच्या तहसीलदारांची भेट घेतली. त्यांना एक निवेदन देत गुजरातमध्ये सहभागी करून घेण्याची मागणी केलीय.
समितीची केली स्थापना
नाशिकमधल्या सुरगाणा तालुक्यातल्या 55 गावांना गुजरातमध्ये जायचे आहे. त्यासाठी त्यांनी गुजरातमधल्या वासदाच्या तहसीलदारांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. तसेच गुजरातमध्ये सामावून घ्या, अशी मागणी केली. त्यासाठी या गावांनी गुजरात विलीनीकरण संघर्ष समितीची स्थापना सुद्धा केलीय. दुसरीकडे डांगच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटूनही निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामणी गावित यांनी दिलीय.
का केली मागणी?
नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यात सोयी-सुविधांचा अभावय. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. मात्र, येथे अजूनही वीज, पाणी, रस्ते हाच प्रश्न सुटलेला नाही. आरोग्य, शिक्षणाची सोय नाही. गावात मोबाइल आला, पण नेटवर्क नाही. विशेष म्हणजे या गावांपासून अवघ्या दोन किलोमीटरवर गुजरातय. मात्र, तिथे या सर्व सुविधा असल्याने नागरिकांनी गुजरातमध्ये सामील करून घ्या, अशी मागणी केलीय.
कलेक्टरकडून मनधरणी
नाशिक जिल्ह्यातल्या गावांनी गुजरातमध्ये सहभागी होण्याची मागणी केलीय. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामणी गावित यांचा समावेश होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने ही गावित यांची वैयक्तिक मागणी आहे. पक्षाचा संबंध नाही, अशी भूमिका जाहीर केलीय. दुसरीकडे नाशिकच्या कलेक्टरनी सुरगाणा गाठत गावकऱ्यांशी चर्चा केली. पायाभूत सोयी-सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले. मात्र, अजूनही हे गावकरी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे समजते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.