आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याच्या सांस्कृतिक धोरण समिती कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिली.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० साली सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आले आहे. या सांस्कृतिक धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी मुबंई मंत्रालयात झालेल्या बैठकीत एक समिती नुकतीच गठीत करण्यात आली आहे.
अशी आहे समिती
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या समितीत सांस्कृतिक कार्यमंत्री हे अध्यक्ष असतील, तर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे कार्याध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, उपसचिव, पर्यटन विभागाचे उपसचिव, पर्यटन संचालनालयाचे व्यवस्थापकीय संचालक, क्रीडा संचालनालयचे आयुक्त, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव, भाषा संचालनालयाचे संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक, कला संचालनालयाचे संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक हे शासकीय सदस्य असतील. याशिवाय गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, सुहास बहुळकर, कौशल इनामदार, बाबा नंदनपवार, जगन्नाथ हिलीम, सोनू दादा म्हस हे या समितीत अशासकीय सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील.
समितीची बैठक दर 3 महिन्यांनी
नव्याने नियुक्त करण्यात आलेली समिती सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, सांस्कृतिक बाबींचे स्वरूप काळाच्या ओघात बदलत असते. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार सांस्कृतिक धोरण सुसंगत करणे, तसेच विविध क्षेत्रातील तज्ञांकडून आणि सर्वसामान्यांना नागरिकांकडून धोरणाच्या संदर्भात प्राप्त सूचनांनुसार विचारमंथन करून नवीन धोरणाचा मसुदा शासनास सादर करणे असे कार्य अपेक्षित आहे. सदर समितीची बैठक दर तीन महिन्यांनी एकदा होणार आहे. या समितीचा कालावधी शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून १ वर्ष अथवा शासन जोपर्यंत आदेश देईल तोपर्यंत असणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.