आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरिवर्त बहुउद्देशीय संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारे राज्यस्तरीय समाज प्रबोधनपर शाहिरी, काव्य आणि वाङ्मय पुरस्कार २०२२ची घोषणा संस्थेचे अध्यक्ष प्रा. गंगाधर अहिरे, सचिव प्राचार्य दिनकर पवार आणि समन्वयक नितीन बागूल यांनी केली. विनायकदादा पाठारे, विजय इंदुशोकाई, बुद्धभूषण साळवे यांच्या साहित्याला गौरविण्यात येणार आहे.
तर २०२१ चे वाङ्मयीन पुरस्कार डॉ. संजय जाधव यांच्या संघर्ष वाटा-स्वकथनला, कवी लक्ष्मण हाडीक यांच्या स्त्री कुसाच्या कविता या कवितासंग्रहाला आणि दिशा पिंकी शेख यांच्या कुरूप या काव्यसंग्रहाला, अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांच्या जात पंचायतींना मुठमाती या वैचारिक पुस्तकाला प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार निवड समितीत कवी अमोल बागूल, कवी अविनाश गायकवाड, डॉ. धीरज झाल्टे, कवी प्रदीप जाधव यांचा समावेश होता.
कवी अरुण काळे स्मृती ‘अजातशत्रू’पुरस्कार
हा पुरस्कार दोडाईचा येथील कवी विजय इंदुशोकाई यांच्या बीईंग या कवितासंग्रहाला व बुद्धभूषण साळवे यांच्या तूर्तास तरी... या कवितासंग्रहाला देण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच एका सोहळ्यात हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
महाकवी वामनदादा स्मृती ‘वादळवारा’ पुरस्कार
हा पुरस्कार दिवंगत शाहीर विनायकादादा पाठारे यांना देण्यात येणार असून रोख रक्कम, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पाठारे यांच्या पत्नी लताबाई पाठारे हे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. पुरस्कार निवड समितीत प्रा. अहिरे, नितीन भुजबळ, चंद्रकांत गायकवाड, करुणासागर पगारे यांचा समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.