आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबड एमआयडीसीतील समस्या:पोल पथदीपांवरील वेली दुर्लक्षित; खाली तळापासून वरपर्यंत दाट वेली

सिडकाे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्युत मंडळ व महापालिकेच्या वतीने औद्योगिक वसाहतीत तसेच संपूर्ण शहरात रस्त्यांवर पथदीप व विजेचे पोल लावण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी हे पोल झाडे व वेलींच्या विळख्यात सापडल्याने विजेचा प्रकाश रस्त्यावर पडत नसून त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्यापूर्वी पालिका व विद्युत मंडळ ज्या ठिकाणी उघड्या विद्युत तारा किंवा पथदीप यांना झाडांच्या फांद्या लागत असतील ती झाडे व वेली छाटतात. त्यामुळे मोठे अनर्थ टळतात, पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या वेली या थेट पोलवर गेल्या आहेत, त्यामुळे पथदीपांचा प्रकाश झाकला जातो तर अनेक ठिकाणी विद्युत डीपीसुद्धा या झाडावेलींनी झाकल्या आहेत. तेथील वेली व झाडांची पालिकेने तसेच वीज वितरण कंपनीने छटाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...