आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:कांदा अनुदानाच्या जाचक अटी रद्द न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन; दिघोळे यांचा इशारा

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांदा अनुदानासाठी शासनाने घालून दिलेल्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेचे राज्य अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला.रविवारी (दि. २) सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे आयोजित कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीमध्ये कवडीमोल दर मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात आंदोलने झाली. त्यानंतर ३५० रुपये कांदा अनुदान जाहीर केले. अनुदान मिळण्यासाठी शासनाने ज्या-ज्या कागदपत्रांची मागणी केली आहे. त्यामध्ये कांदा विक्री केल्याची बाजार समितीमधील पावती, त्याचबरोबर आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, तसेच सातबारा उताऱ्यावर ई-पीक पाहणीद्वारे रब्बी हंगामातील कांदा पिकाची नोंद असण्याच्या जाचक अटी घालण्यात आल्या आहेत, त्या रद्द कराव्यात.