आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये शिवसैनिकांच्या संतापाचा तीव्र उद्रेक:राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत दहन

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे शालिमार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत पुतळा दहन करण्यात आला.

'राज्यपाल हाय हाय',काळी टोपी हाय हाय,हद्दपार करा हद्दपार करा- राज्यपालांना हद्दपार करा आदी घोषणांनी आसमंत परिसर दणाणला होता. राज्यपालांनी आत्तापर्यंत अनेकदा आक्षेपार्ह विधाने केली आहेत.महापुरुषांबद्दलही आता ते सातत्याने वाटेल ती विधाने करून राज्यातील जनतेचा रोष ओढवून घेत असून महाराष्ट्रातील जनता त्यांचा हा बेतालपणा मुळीच खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो.त्यामुळे त्यांनी महापुरुषांबद्दल वक्तव्य करतांना त्याच्याबद्दल आदर बाळगणे आणि त्यांचा अवमान होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.मात्र असे असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल आक्षेपार्ह विधाने करून सातत्याने टीकेचे धनी होत आहेत.या राज्यपालांना पंतप्रधानांनी समज देणे गरजेचे असून त्यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करावी,असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी भाषणात सांगितले.

आंदोलनप्रसंगी उपजिल्हाप्रमुख जगनराव आगळे,विधानसभा प्रमुख योगेश बेलदार,सुभाष गायधनी,महिला आघाडी जिल्हा संघटक शोभा मगर,शोभा गटकळ,उप महानगरप्रमुख योगेश देशमुख,राजेंद्र क्षिरसागर देवा जाधव,सचिन बांडे,दत्ता दंडगव्हाळ,नाना पाटील,शशिकांत कोठूळे,समन्वयक सुनिल निरगुडे, मसूद जिलानी,राहूल दराडे,अजय चौघले, रमेश उघडे,मा.नगरसेवक भागवत आरोटे,शाम खोले,उत्तम कोठूळे,नयना गांगुर्डे,रंजना बोराडे,हेमलता कांडेकर,सतिष खैरणार,महिला पदाधिकारी श्रध्दा दुसाने,गायत्री पगार,फैमिदा रंगरेज,शोभा दिवे,माधूरी जाधव सिमा डावखर,बेबीनंदा गवळी,रंजना थोरवे,सुवर्णा काळूंगे, तसेच शिवसेना पदाधिकारी पदाधिकारी संजय थोरवे,महेद्र बडवे,रुषी वर्मा,सचिन निकम अर्जुन निस्ताने,माझीद पठाण,गोरख वाघ ,संजय चिचोरे,आभिजीत पांडे, विक्रांत थोरात,किरण शिंदे,अजय काकडे,हेमंत उन्हाळे,व लोकप्रतिनीधी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचवेळी राज्यपाल आणि त्यांचा निषेध न करणाऱ्या शिंदे सेना आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन करण्याच्या आले.

बातम्या आणखी आहेत...